धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाचा खून, बायपास वरील गजानन नगरी येथिल घटना

वणी /

 धारदार शस्त्राने गळा चिरुन तसेच डोक्यावर वार करुन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना बायपास वरील वणी ते वडगाव (टीप) मार्गावर गजानन नगरी लेआऊट मधील सुनसान जागेवर ही घटना घडली.
हि घटना शुक्रवारी २४ ऑक्टोंबर ला दुपारी 3.30 वाजता उघडकीस आली. मृतकाचे वय अंदाजे 32 ते 35 वर्ष आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली. युवकाचा खून गुरुवारी रात्री दरम्यान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बातमी लिहेपर्यंत फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहचले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे.

खून करण्यात आलेल्या युवकाची ओळख पटली असून अजय किशोर राऊत रा. रंगनाथ नगर असल्याची माहिती मिळाली आहे. अजय चा गुरुवारपासून पत्ता नव्हता आणि त्याचा मोबदला सुद्धा बंद अवस्थेत होता अशीही माहिती मिळाली. पुढील तपास पोलीस करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post