श्री उज्वल गौरक्षण मध्ये वसुबारस निमित्त गोवत्स पूजेचा सुंदर कार्यक्रम

वणी /

वसुबारस निमित्त श्री उज्वल गौरक्षण संस्था वणी येथे पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभावाने गोवत्स पूजेचा कार्यक्रम १७ ऑक्टोंबर ला संपन्न झाला.

या प्रसंगी श्री उज्वल गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील झाबक, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, अनुप खत्री, मेघश्याम तांबेकर,काळे गुरुजी, सुरेंद्र मदान, चंद्रकांत जोबनपुत्रा, डॉ. राठोड, तुषार नगरवाला, कैलास बोबडे यांच्या सह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या पूजेत सहभाग घेतला. 
गोमातेची आरती, फुलमाला व नैवेद्य अर्पण करून सर्वांनी "गोमातेचा जयजयकार" केला.
 समाजात गोरक्षण, गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व याची जाणीव करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे गौरक्षणातील वातावरण भक्तिमय झाले असून सर्वांनी हा दिवस आनंदात साजरा केला.

Post a Comment

Previous Post Next Post