स्व. राजाभाऊ पाथ्रडकर यांना जिल्हा पोलीस विभाग व शांतता समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

वणी : 

 शांतता समितीचे सदस्य स्व. राजाभाऊ पाथ्रडकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने वणी शहरात हळहळ व्यक्त होत असून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 
यवतमाळ जिल्हा पोलीस विभाग व शांतता समितीच्या वतीने दिनांक ३ ऑक्टोबर ला संध्याकाळी ८ वाजता शहरातील रविंद्रनाथ टागोर चौक येथे आयोजित कार्यक्रमाला शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, व्यापारी मंडळ, पत्रकार बांधव व सोनार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान प्रा.पुरुषोत्तम पाटील, रज्जाक पठाण,रवि बेलुरकर, राकेश खुराणा, मंगल तेलंग, दिपक छाजेड, सहा पो.अधिकारी शेखर वांढरे, जोबनपुत्रा, प्रमोद निकुरे, मंगलाताई झिलपे, निलिमाताई काळे, शालिनी रासेकर, पोलिस निरीक्षक, ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्यासह शांतता समितीच्या सदस्यांनी 
 स्व. राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या समाजकार्याची आणि शांतता समितीतून दिलेल्या योगदानाची उजळणी केली. त्यानंतर त्यांच्या स्मृतींना सर्वांनी दोन मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली दिली.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी स्व. राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी काम करण्याचा संकल्प केला.
यावेळी शांतता समितीचे सदस्य नारायण गोडे, नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, अनुप खत्री, सौ.संध्याताई अवताडे, सौ.आरती वांढरे, सौ. सुमित्रा गोडे, मंदा बांगडे, सौ. विजया आगबत्तलवार, गजरा जयस्वाल, पत्रकार परशुराम पोटे, ‌रमेश तांबे, महादेव दोडके, नरेंद्र लोणारे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post