वणी :
वणी पंचायत समितीचे माजी सभापती, ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलचे कार्यकारी संचालक तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे यांनी घरीच तयार केलेल्या कुंडात गणपती मूर्तीचे विसर्जन केले.
यावेळी ते म्हणाले की, निर्गुडा नदी म्हणजे शहराची जीवनदायीनी आहे. मूर्ती मातीची असली तरी त्यातील रंगात केमिकल असतात. त्यामुळे जलप्रदूषण होतं. आपण आपली निर्गुडा नदी स्वच्छ ठेवली पाहिजे. ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. निर्माल्य हे निर्मल्य कलशातच ठेवावे. अनेकजण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरतात. त्या विरघळतही नाही. नष्टही होत नाही. अशा मूर्तीची अवहेलना होते. ती आपण टाळली पाहिजे.