श्री विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र वणी व्दारा आयोजित वात विकारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन, आयुर्वेदिक नाडी परीक्षण उपचार व पंचकर्माने मिळवा वातविकारांपासून कायमची मुक्ती...

वणी/

श्री विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र वणी व्दारा 
वात विकारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

 सदरचे शिबिर हे श्री विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र विजय फर्निचरच्या वरती, एल.टी. कॉलेज जवळ, वणी येथे येत्या ७,८,९ सप्टेंबर रविवार, सोमवार, मंगळवार रोजी सकाळी ७:३० ते दुपारी १ व सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
विशेष म्हणजे वातविकारांवर उपाशीपोटी नाडीपरिक्षण आयुर्वेदोक्त रोगनिदान ठेवण्यात आले आहे.

वाताचे विकार -संधीवात/ आमवात / गढीयावात , लकवा, पॅरालिसीस. मणक्यांमधील गादी बाहेर निघणे, मणके झिजणे. मणक्यांमध्ये गॅप पडणे. हातापायात जडपणा, मुंग्या येणे, खांद्यापासुन हात वर न जाणे, ढोपरात असह्य वेदना, चालतांना, उठता बसताना, गुडघे, कमरेत वेदना गुडघ्यांचे ऑपरेशन सांगितले असल्यास पोटात गॅस होणे, शौचास खडा होणे. मानेपासुन वर डोकेदुखी खांदे दुखणे, चिकनगुनीया , लकवा इत्यादींवर तपासणी करण्यात येणार आहे.
तर अग्निकर्म, विद्यकर्म उपनाह , उत्कारीका रक्तमोक्षण , दिपयंत्र जानुबांधणी, पाठबांधणी ,लेपन हिरवा लेप/लाल लेप चिकित्सा, ,
मोफत करण्यात येणार आहेत.
शिवाय पंचकर्म उपचारांवर २०% सुट,तर औषधांवर २०% सवलत म्हणजे ७०० रु. चे औषध ५२० रु.मधे , सवलतीच्या दरात मिळणार असून तिन महिने तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
शिबिराचे पुर्व नाव नोंदणी आवश्यक असून चालू उपचार कागदपत्रे सोबत आणावे असेही त्यांनी सांगितले.
नाडी तपासणी करीता पाणी,चहा, काॅफी,दुध ऐवढेच पिवुन यावे.न्याहारी वा जेवण घेवू नये.
या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्य सुवर्णा सु. चरपे बि.ए.एम.एस.डि.वाय.ए. (पुणे) Reg.No.1-45390-A यांनी केले आहे.
 
आजपासून नोंदणी सुरू..

नोंदणी करीता संपर्क क्रमांक 7038381553, 9359621501 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post