कॉंग्रेस नेते संजय खाडे यांची अचलपूर विधानसभेच्या प्रभारीपदी निवड

वणी -

 वणी विधानसभा क्षेत्रातील कॉग्रेस नेते संजय खाडे यांची अचलपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानूसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

सामाजिक, शैक्षणिक असे विविध कार्यात अग्रेसर असलेले संजय खाडे हे परिसरात कामगार आणि शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात, त्यांनी शेतकरी व कामगाराच्या प्रश्नावर विविध आंदोलन मोर्चे काढून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामूळे त्यांच्या कार्याची दखल घेवून कॉग्रेस पक्षाने मोठी जवाबदारी त्यांना सोपवली आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखविणार असा विश्वास संजय खाडे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post