वणी /
एकीकडे संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दोन शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना वणी तालुक्यात घडली आहे.
तालुक्यातील नवरगाव (सैदाबाद) येथिल शेतकरी राजकुमार मारोती गोवारदीपे वय अंदाजे 55 वर्ष यांनी १५ ऑगस्ट ला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी गावात झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू असतांनाच त्यांनी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. या घटनेची माहिती मिळताच त्यांना उपचारासाठी तातडीने वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावे मौजा नवरगाव येथे शेतजमीन आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन व दोन नातवंडे असा परिवार आहे. राजकुमार यांनी आत्महत्या का केली? याची माहिती मिळू शकली नसुन पुढील तपास पोलीस करत आहे.
तर दुसरी घटना कळमना (बु.) येथे घडली.
येथिल शेतकरी सहदेव विश्वनाथ बोबडे यांनी दिनांक १५ ऑगस्ट ला स्वतःचे राहते घरी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान विषारी औषध प्राशन केले असता त्यांना वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री ०९ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या नावे मौजा कळमना (बु) येथे १.२९ है. आर. जमिन आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई, वडील असा आप्त परिवार आहे.
सहदेव यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नसुन पुढील तपास पोलीस करत आहे.