वणी /
श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त जय श्री कृष्ण जन्माष्टमी समिती तर्फे विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन १३ ते १७ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे.
दिनांक १६ ऑगस्ट ला श्रीकृष्ण भवन येथील श्रीकृष्ण मंदिरात दुपारी तीन वाजता भगवान श्रीकृष्णाची पूजा,आरती झाल्यानंतर जय श्री कृष्ण जन्माष्टमी महिला समिती तर्फे दिव्यांग व्यक्तीला सायकल भेट देण्यात आली.
यावेळी जय श्री कृष्ण जन्माष्टमी महिला समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
*आज रविवारी सायंकाळी भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन*
जय श्री कृष्ण जन्माष्टमी समितीच्या वतीने आज रविवारी दिनांक १७ ऑगस्ट ला सायंकाळी पाच वाजता भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हि शोभायात्रा अमृत भवन येथुन निघणार असून शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत अमृत भवन येथे समारोप होणार नाही.
या शोभायात्रेत भव्य धुमाल बॅन्ड, वारकरी भजन, श्रीकृष्ण झाकीया, भव्य डिजे, श्री हनुमानजी व गोरीला, यांसह विविध प्रकारच्या झाकीया वणी करांचे डोळ्याचे पारणे फेडणार आहे.
तरी या शोभायात्रेत श्री कृष्ण भक्तांनी समभागी होण्याचे आवाहन जय श्री कृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड कुणाल विजय चोरडिया व समितीच्या वतीने करण्यात आले आहे.