ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पोलिस दादांना बांधल्या राख्या, रक्षाबंधन निमित्त ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम

वणी /

 रक्षाबंधनाच्या पर्वावर ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकारी, बस ड्रायव्हर आणि केअर टेकर सह सामुदायिक मदतनीसांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन उत्सव साजरा केला. विशेष म्हणजे पर्यावरण रक्षणाच्या महत्त्वाचे प्रतीक असलेल्या चिमुकल्यांनी झाडांनाही राख्या बांधल्या.
सदर कार्यक्रम ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल चे कार्यकारी संचालक संजय पिंपळशेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. पूजा वाय. जोबनपुत्रा आणि समन्वयक सौ. मृणाली एम. दंतुलवार, तसेच ज्येष्ठ शिक्षिका सौ. ज्योती ए. पालवे, सौ. प्रिया ए. सांते, आणि सौ. कांचन ए. दानव यांच्या उपस्थितीत हा उपक्रम दिनांक ८ ऑगस्ट ला सकाळी १०:३० वाजता वणी पोलिस स्टेशनमध्ये पार पडला.
या उत्सवामागील हेतू मुलांना समुदाय सहाय्यकांचे महत्त्व आणि समुदाय सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या समर्पणाबद्दल शिक्षित करणे हा होता. असे शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. पूजा वाय. जोबनपुत्रा यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post