वणी /
आज दिनांक २१ जुलै २०२५ रोजी मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी (CBSE), वणी येथे “एक पेड माँ के नाम” हा पर्यावरण संवर्धन व मातृप्रेम व्यक्त करणारा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना मॅडम होत्या. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण शिक्षक श्री सुधीर लडके यांनी केले. मुख्याध्यापिका शोभना मॅडम यांनी उपस्थितांना संबोधित करताना झाडांचे पर्यावरणातील महत्त्व स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या, “झाडे म्हणजे जीवनाचे आधार आहेत. आपल्या आईप्रमाणेच झाडेही आपल्याला जीवन, ऑक्सिजन, अन्न आणि सावली देतात. म्हणूनच झाडांचे संवर्धन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.”
विद्यार्थ्यांनी आपल्या आईसह शाळेच्या परिसरात झाडे लावली व झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमात शिक्षकवृंद, विद्यार्थी व इतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.