डॉक्टर अलोने यांचा लौकिक अधिक संपन्न व्हावा - सरपटवार

वणी /
     
शैक्षणिक सामाजिक कृषी कला या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तुत्वाने अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त करणारे लोक कलावंत डॉक्टर दिलीप अलोने यांचा लौकिक अधिक संपन्न आणि समृद्ध व्हावा असे मत ज्येष्ठ कलावंत व सामाजिक कार्यकर्ते विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष माधवराव शरपटवार यांनी व्यक्त केले.

संस्कार भारती समिती व सागर झेप बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने येथील विनायक मंगल कार्यालयात आयोजित नटराज पूजन आणि गुरुपूजन या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सरपटवार आपले विचार व्यक्त करीत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कलावंत अशोक सोनटक्के, लोक कलावंत राम झिले, अर्थतज्ञ डॉक्टर करम सिंग राजपूत ,समितीच्या अध्यक्षा रजनी पोयाम, सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई अवताडे उपस्थित होते. 
प्रारंभी नटराज पूजन आणि गुरुपूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी डॉक्टर दिलीप अलोने व त्यांचे शिष्य लोक कलावंत राम झिले यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर मुने यांनी केले व कार्यक्रमाची भूमिका विशद केली यानंतर डॉक्टर अलोने, डॉक्टर करम सिंग राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 याप्रसंगी कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या बाल कलावंतांचाही सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक शहर म्हणून वनी ची ओळख आहे या शहरात अनेक कलावंतांनी आपली कला जोपासत शहराचा सांस्कृतिक वारसा अधिक संपन्न केला आहे ही परंपरा अधिक जोमाने जोपासला गेली पाहिजे असेही सरपटवार यांनी मत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे संचालन पंढरीनाथ सोनटक्के यांनी केले तर सातपुते यांनी आभार मानले. यानंतर भक्ती गीतावर आधारित नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारती व सागर झेप या दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post