वणी /
शहरातील भाजी मंडीतील मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार, दि. 30 जुन रोजी करण्यात आली. विशेष म्हणजे एकाच दिवशी एकाच ठिकाणी दोन वेळा ही कारवाई करण्यात आल्याने मटका बहादुराना चांगलीच धडकी भरली.
सोमवारी 30 जुन रोजी दुपारी 1 ते 1:30 वाजताच्या सुमारास भाजीमंडी येथिल शौचालयाचे जवळ करण्यात आलेल्या कारवाईत 1 ते 10 आकड्यांच्या चिठ्ठ्या लिहून लोकांकडून पैसे घेत असताना आरोपी अक्रम सय्यद गफ्फार (42)रा. रजानगर वणी, व शेख मजीत शेख सत्तार (40) रा.मोमीनपुरा वणी हे मिळून आले त्यांच्याजवळून नगदी 550/- रुपये व 1 ते 10 आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या तसेच वरळी मटका साहित्य मिळून आल्याने पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम सहकलम 49 बिएनएस अन्वये गुन्हा नोंद केला.
तर दुसरी कारवाई त्याच दिवशी त्याच ठिकाणी म्हणजे सोमवारी 30 जुन रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान
भाजीमंडी येथील शौचालयाचे जवळ आरोपी गणेश कवडु उपरे (26) रा. कोणा ता. वणी , शेख रज्जाक शेख वहाब (55)रा. सोमनाळा ता.वणी, विठ्ठल गणपत हनुमंते(47) रा. नायगाव ता. वणी, साधु आत्माराम राजगडे (56)रा. ब्राम्हणी वणी, अब्दुल हाफीज उर्फ टापु अब्दुल सत्तार (40)रा. मोमीनपुरा वणी हे 1 ते 10 आकडयाच्या चिठ्ठ्या लिहुन लोकांकडुन पैसे घेत असताना मीळुन आले. त्यांचे जवळुन नगदी 5390/- रुपये तसेच वरळी मटका साहित्य मिळून आल्याने फिर्यादी पोशि/ हरिभाऊ दळवे पो. स्टे. वणी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम 12 (अ) मजुका सहकलम 49 बि.एन. एस अन्वये गुन्हा नोंद केला.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक सुदाम आसोरे नापोका /विशाल,पोकॉ /मिथुन, पोकॉ/ घुगे, पोकॉ /दळवे यांनी केली.