भाजपा वणी शहराध्यक्षपदी जेष्ठ विधिज्ञ ऍड. निलेश चोधरी यांची नियुक्ती

वणी /

निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वच पक्ष कामी लागले असून यात नेहमीच अग्रगण्य असणारी भाजपच मागे कशी राहणार, नेहमीच वणी विधानसभा क्षेत्रात निवडणुकी दरम्यान वणी शहर हा कळीचा मुद्दा असतो येथील स्थिती च्या आधारावर बरंच राजकीय समीकरण बदलत असतात हाच विचार करून भरारीय जनता पक्षाने शहरच्या अध्यक्षस्थानी येथील प्रसिद्ध विधिज्ञ ऍड. निलेश माया महादेवराव चोधरी यांची वर्णी लावून नगर पालिकेच्या निवडणुची धुरा त्यांच्या हाती दिली व किंबहुना पक्ष वाढिचे कार्य त्यांच्यावर सोपवले आहे.
रॉयल फाउंडेशन वणी चे संस्थापक, वकिली क्षेत्रातील दांडगा आणि दीर्घ अनुभव सोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत यशस्वी नेतृत्व या निमित्ताने पक्षाला मिळाल्याने नगर पालिका,जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणी तत्सम निवडणुकीत हा अनुभव पक्षाला नक्कीच उपयोगात पडेल याच विचाराने वणी येथील पक्षाच्या छोटेखानी कार्यक्रमात पक्षाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष ऍड.प्रफुल चौहान यांनी तसेच भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पक्षश्रेष्ठीनी शहराध्यक्षाची धुरा ऍड.चौधरी यांचेवर सोपवली आहे.
 यावेळी कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी एड. निलेश चौधरी यांचा मित्रपरिवार तथा रॉयल फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post