वणी शहरात पाणी टंचाईचे सावट!

वणी /

बऱ्याच दिवसांपासून शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे वणीकर नागरिक हताश झाले आहे. या पाणी टंचाई मुळे शहरात उद्रेक निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने व आमदार संजय देरकर यांनी याकडे तात्काळ लक्ष देवून पाणी समस्येकडे लक्ष द्यावे. अशी नागरिकांची मागणी आहे.

चार दिवसांआड होतो पाणी पुरवठा

वणी शहरासाठी करोडो रुपयांची पाणी पुरवठा योजना आहे मात्र नियोजनाअभावी वणी करांना चार दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे वणी कर आता संतापले असून केव्हा उद्रेक होईल याचा काही नेम नाही त्यामुळे नगर पालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पाणी समस्या दूर करावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post