वणी आगाराला नवीन लालपरी बस मिळवून देणारच! - राजु धावंजेवार

वणी :

वणी आगाराला नवीन लालपरी बस मिळण्याकरिता मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने परिवहनमंत्री मा. प्रताप सरनाईक यांचेकडे १५ दिवसापुर्वी मागणी करण्यात आली त्या निवेद‌नामध्ये १५ दिवसात लालपरी उपलब्ध न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता परंतु जनहितार्थ दिलेल्या निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्यामु‌ळे व आजपावेतो वणी आगाराला नवीन बस न उपलब्ध झाल्यामु‌ळे सोमवार ५ मे पासुन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार मानवी हक्क सुरक्षा परिषद हे आमरण उपोषण करणार आहे.

वणी आगाराला नवीन लालपरी बस मिळवून देणारच - राजु धावंजेवार

वणी आगारातील लालपरी बस ची हालत फारच खराब झाली आहे लालपरी बस आता धक्का परी झाली असून जिथे तिथे भर रस्त्यावर बंद पडत आहेत परिणामी चालक वाहकांचे हाल होत आहे तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ लागली त्यामुळे आता लालपरी बस साठी सोमवारपासून आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत वणी आगाराला नवीन लालपरी बस मिळवून देणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही - *राजु धावंजेवार, मानवी हक्क सुरक्षा परिषद राज्याध्यक्ष*

Post a Comment

Previous Post Next Post