वणी /
स्थानिक वणी येथील जैताई मंदिर येथे बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे मोठ्या थाटात परशुराम जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मोटर सायकल रॅली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात सकलं ब्राह्मण समाजातर्फे तसेच बहुभाषीक ब्राह्मण सभा आणि ब्राह्मण महासंघ तर्फे 29 एप्रिल मंगळवारी परशुराम जयंतीचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये किमान 300 मोटर सायकल घेऊन ब्राह्मण बांधव समविष्ट झाले होते.
कमलेश तिवारी हे परशुराम यांच्या भूमेकेत होते तर त्यानंतर जैताई मंदिराचे अध्यक्ष श्री बाळासाहेब सरपटवार, राजू उंबरकर, मुन्ना महाराज तुगनायत तसेच विद्यावाचस्पती डॉ.स्वानंद पुंड यांनी मार्गदर्शन केले.
यादरम्यान पहेलगाव हल्ल्यात मृत भारतीय हिंदू समाज बांधवाना श्रद्धांजली देण्यात आली.
या कार्यक्रमाला राजाभाऊ पाथरडकर,किरण बुजोने,मुलचंद जोशी,नितीन उंबरकर,चंद्रशेखर खोंड.प्रविण पाठक,अमित उपाध्ये, वैभव मेहता,विशाल दूधभले,श्रवन देशकर,उज्वल पांडे,श्रुती उपाध्ये यांनी योगदान दिले. मेवाडी ब्राह्मण सभे तर्फे भोजन व्यवस्था करण्यात आली होती तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी देखील या कार्यक्रमाला सहकार्य केले.