वणी /
शहरातील शास्त्री नगर येथील एका विवाहित तरुणाने शहरातील कब्रस्थान परिसरात गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
जावेद शाह अहेमद शाह अंदाजे वय(३८) या युवकाने बुधवारी ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान कब्रस्तान परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ते पेपर वितरणाचे काम करत होते. शांत स्वभाव असलेल्या जावेद ने आत्महत्या का केली? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे मात्र आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अजुन स्पष्ट नाही. वणी पोलीस तपास करत असून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याचे पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहेत. घरचा कर्ता पुरुष निघून गेल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.