दिलीप भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) च्या वणी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

वणी /

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पार्टीच्या वणी विधानसभा अध्यक्षपदी वणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा गोर गरिबांचे कैवारी दिलीप भोयर यांची जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांनी आज ता.२८ रोजी दुपारी २.३० वाजता शासकीय विश्राम गृह यवतमाळ येथे नियक्तीपत्र देऊन नियुक्ती केली आहे.

दिलीप भोयर हे सामाजिक व पत्रकारितेच्या कार्यात मोठ नाव असून अनेक चळवळीतील कार्यकर्ते आहे. त्यांनी आपला राजकीय प्रवास वंचित बहुजन आघाडी या पक्षातून वणी तालुकाध्यक्ष व वणी विधानसभा अध्यक्ष असा पदभार सांभाळून उत्कृष्ट वाटचाल केली होती. मागील लोकसभा निवडणूक संपताच त्यांनी मुंबई येथे जावून पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश घेतला होता. त्यांचे सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांनी त्यांची वणी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. 

वणी विधानसभा क्षेत्रात दिलीप भोयर यांचे सामाजिक व गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव्य तत्पर्यतेचे कार्य असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगली बळकटी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीने त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नियुक्तीपत्र देते वेळी वणी विधानसभेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत खाडे, रामदास पखाले आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post