वणी /
श्रीराम जन्मोत्सवं समिती वणी द्वारा आज दिनांक 4 एप्रिल शुक्रवार ला वणी येथे स्वर संध्या गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वणी येथील संगीत शिक्षक श्री अजित खंदारे सर आणी वर्धा येथिल प्रसिद्ध गायिका सौ खुशबू कठाणे यांच्या भक्ति आणी भावगीत ची मैफिल श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.
प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती दर वर्षी चैत्र नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करते त्यातीलच एक भाग म्हणून या वर्षी शुक्रवार दिनांक 4 एप्रिल ला सायंकाळी भावगीत आणी भक्ती गीत च्या मैफिल चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला वणी तील सर्व श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्तित राहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.