वणी /
धनोजे कुणबी समाज सभाग्रुह चिखलगाव येथील योग वर्गाच्या वतीने श्रीराम नवमी व जगन्नाथ बाबा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम घेउन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.नामदेवराव जेनेकार हे होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रामराव गोहोकार,श्री.सुधाकरराव गारघाटे,श्री.रमेश बोबडे,श्री.
नानाजी विधाते,श्री.अर्जुनराव गोहोकार,श्री.सारनाथ सोनटक्के, श्री.सुभाष बोबडे, श्री. कवडु नागपुरे, श्री. संजय बदखल, सौ.मायाताई माटे, सौ.शारदा काकडे सौ. ममता श्रीवास्तव, सौ. वनिता क्षीरसागर सौ. रेखा उपरे ईत्यादी होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून श्रीरामाच्या व जगन्नाथ बाबा यांच्या प्रतीमेचे पूजन,हारार्पन व वंदन करण्यात आले.
श्रीराम व जगन्नाथ बाबा यांचे जीवन चरित्रावर आधारीत पाळणागीत,भजन,गीतगायन करण्यात आले. भारत स्काउट व गाईड या चळवळीतील लीडर ट्रेनर ही सर्वोच्च परीक्षा पास करून वणी सह यवतमाळ जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त करणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.रमेश बोबडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच श्री.सारनाथ सोनटक्के यांचा 65 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.दिगंबरराव गोहोकार यांनी केले ,सूत्रसंचालन श्री.लक्ष्मण इद्दे यांनी करून आभार प्रदर्शन श्री.वसंतराव उपरे यांनी व्यक्त केले.
यावेळी वणी शहरातील सर्व योग वर्गातील बहुसंख्य योग शिक्षक व योग साधक हजर होते.