वणी /
वणी पंचायत समिती येथिल (घरकुल) संगणक ऑपरेटरवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पळसोनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री पुखराज धर्माजी खैरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर व वणी तालुका अध्यक्ष प्रविण झाडे यांना देण्यात आले असून या निवेदनाच्या प्रती वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वणी, तहसीलदार वणी यांच्यासह वणीच्या ठाणेदारांना देण्यात आली आहेत.
सविस्तर बातमी अशी की, वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत पळसोनी येथील उपसरपंच पदावर कार्यरत असलेले श्री पुखराज धर्माजी खैरे हे गावातील नागरिकांच्या कामासाठी तालुक्याचे ठिकाण असलेल्या वणी शहरात नेहमीच येत असतात. सध्या गावात घरकुलांचे कामे सुरू आहेत परंतु काही लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाचे अनुदान जमा झाले नाही त्यामुळे याची माहिती उपसरंपच असलेले श्री पुखराज खैरे यांना सांगितली असता त्यांनी सदर घरकुलाचे संदर्भात विचारणा करण्यासाठी पंचायत समिती, वणी येथ दि.०५ मार्च २०२५ रोजी दुपारी १२.३० ते ०१.०० वाजताचे दरम्यान घरकुलाचे लाभार्थी श्रीमती सुमित्रा मंगल उईके यांचे घरकुलाचे पैसे जमा झाले नसल्यामुळे त्याबाबत घरकुल खाजगी संगणक ऑपरेटर अश्विन मस्के यांचेकडे ऑनलाईन यादी तपासणी करण्याकरीता गेले होते तेव्हा त्या ऑपरेटर यांनी "कंप्युटर साफ्टवेअरला विचार, मला विचारायच नाही, तुला माझी ज्याच्याकडे तक्रार करायची आहे ते कर, माझे कोणीच काही वाकडे करु शकत नाही अशी मुजोरीची भाषा वापरुन माझे अंगावर धावुन आले व मला अपमानित करीत तूला पाहून घेईल अशा प्रकारच्या भाषेचा वापर केला." यापूर्वी सुध्दा त्यांनी अनेकदा अशाच भाषेचा वापर केला आहे असे उपसरंपच पुखराज खैरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
घरकुल संबंधी विचारणा करण्याचा आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींचा अधिकार नाही काय ? हा खाजगी संगणक ऑपरेटर कुणाच्या भरोशावर मुजारीने वागणुक करीत आहेत ? असा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाला आहे. अशा मुजोर खाजगी कर्मचा-याला * प्रशासनाने पाठीशी घालणे अपेक्षित नाही.
मुजोर घरकुल खाजगी संगणक ऑपरेटर अश्विन मस्के यांचेवर ७ दिवसांचे आंत कार्यवाही करुन तसे लेखी स्वरूपात कळवावे असे उपसरंपच पुखराज खैरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आता पंचायत समिती प्रशासन त्या घरकुल संगणक ऑपरेटरवर काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.