दिनदुखीयांचे नाथ हरपले!, दीनानाथजी आत्राम सर यांचे अकस्मात निधन

वणी /

 नगर परिषद शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री दिनानाथ आत्राम सर तसेच सेवावृत्तीनंतर तहसील कार्यालयात निःशुल्क सेवा देणारे सरांचे आज दिनांक १९ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास अकस्मात निधन झाले. मृत्यू समयी ते ७१ वर्षाचे होते.
आज बुधवारी ते तहसील कार्यालयात निःशुल्क सेवा देत असतानाच त्यांना बरे वाटत नसल्याने दुपारी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते असे तहसील कार्यालयातील कर्मचारी सांगत होते.
मनमिळावू स्वभावामुळे ते चांगलेच परिचित असल्याने 
त्यांच्या निधनामुळे वणी शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. उद्या गुरुवारी त्यांच्या मृत्युदेहावर अंत्यसंस्कार होणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

*स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐*

Post a Comment

Previous Post Next Post