वणी उपविभागात 'महाकुंभ' तीर्थदर्शन सोहळा..

वणी /

सामाजिक समरसतेचा मंत्र घेऊन वणी उपविभागीय क्षेत्रातल्या 33 वस्तीमध्ये तीर्थ कलश दर्शन सोहळा घेण्यात आला.
प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान भरलेला महाकुंभमेळा नुकताच संपन्न झाला. हा 45 दिवसांचा धार्मिक कार्यक्रम होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी भाग घेतला. परंतु ग्रामीण भागातील यामध्ये जे 'महाकुंभ' ला जाऊ शकले नाहीत, त्यांच्या पर्यंत तीर्थ कलश दर्शन आणि जल पोहोचविण्याचे कार्य अनुलोम भाग वणी च्या वतीने उपविभाग प्रमुख सुनील दालवनकर , वैभव सुर आणि वैभव मेहता भाग जनसेवक यांनी आयोजन केले होते.
याप्रसंगी हरिभक्त परायण मुन्ना महाराज तुघनायत,
दीपक नवले, घनशाम आवारी, चिंतेश्वरजी वैद्य, गजानन विधाते, प्रज्योत हेपट, अमित उपाध्ये यांनी तीर्थ कलश दर्शन दरम्यान मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post