वणी /
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या झरी तालुक्यातील गणेशपुर (खुर्द) या गावातील माळरानात चंद्रकांत दशरथ घुगुल या शेतकऱ्याने वैशिष्ट्यपूर्ण व मौल्यवान असलेल्या अंजीर फळांची बाग फुलवून उत्पादन घेणे सुरू केले आहेत त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने त्यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
झरी तालुक्यातील पांढरकवडा (लहान) येथिल रहिवासी असलेले चंद्रकांत दशरथ घुगूल हे शिवेसेनेचे अनेक वर्षापासून तालुका प्रमुखपदी आहे ते नेहमी राजकिय सामजिक क्षेत्रातव्यस्त असतात. त्यांची पत्नी झरी पंचायत समितीच्या माजी सदस्या आहेत. त्यांचा सातत्याने तोट्यात चालत असलेल्या शेती व्यवसायाला आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले आणि यातूनच त्यांनी आपले जमिनीत अंजीर फळाचे उत्पादन घेऊ लागले याकरिता त्यांनी चापली पवनसुत नर्सरी चे प्रो. प्रा. राजु तुरणकर यांचे माध्यमातून उच्च प्रतीच्या पुणेरी जातीचे रोपटे आणून सन २०२२ मध्ये ३०० झाडांची लागवड दिड एकरात केली आणि मागील वर्षी त्यांनी १ क्विंटल चे उत्पादन घेतले तर यावर्षी आतापर्यंत दिड क्विंटल अंजीर ची विक्री करण्यात आली असून यावर्षी एकूण तीस क्विंटलचे वर दोनशे रुपये प्रतिकिलो प्रमाणे म्हणजे जवळपास सहा लाखाच्या वर विक्रमी उत्पन्न होणार असल्याचे चंद्रकांत घुगूल यांनी सांगीतले.
संपूर्णतः ऑरगॅनिक पद्धतीने हे उत्पादन सुरू आहे. याकरिता त्यांनी 46 हजार रुपये किमतीचा गोबर गॅस प्रकल्प शेतात उभारला आहे. त्यातून येणारी शेणाची स्लारी पूर्ण झाडांना देण्यात येते.
अंजीर हे वैशिष्टपूर्ण फळ आहे इतर फळापेक्षा ते मौल्यवान मानले जाते कारण ते पित्तविरोधक आणि रक्तशुद्धीरोधक आहेत. भारत, अमेरिका आणि आफ्रिका सह अनेक देशांमध्ये अंजीरांची लागवड केली जाते. त्याचे फळ ताजे आणि सुकलेले अशा दोन्ही प्रकारचे असते. अंजीर पिकल्यावर त्याचा मुरांब्बा बनवून वापरता येतो. ज्या ठिकाणी हवामान समशीतोष्ण आणि कोरडे अशा भागात अंजीरची लागवड केली जाते.
भारतात तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील काही भागात लागवड केली जाते. चार-पाच वर्षांच्या वनस्पतीतून सुमारे 15 किलो फळे मिळतात. पूर्णपणे परीपक्व झालेला अंजीर एका वेळी 12000 रुपयांपर्यंत उत्पन्न देतो.
महाराष्ट्रात अशाप्रकारे लागवड...
व्यावसायिकदृष्ट्या अंजीरची लागवड केवळ महाराष्ट्रातच केली जाते. महाराष्ट्रात एकूण 417 हेक्टर क्षेत्रात लागवड केली जाते, त्यापैकी 312 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र एकट्या पुणे जिल्ह्यात आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवरील नीरा नदीच्या खोऱ्यातील खेर-शिवरा ते जेजुरी या 10-12 गावांचे क्षेत्र महाराष्ट्रातील अंजीर उत्पादनाचा एक प्रमुख भाग आहे. अलीकडे सोलापूर-उस्मानाबादमधील शेतक-यांनी अंजीरांची लागवड सुरू केली आहे. आणि चंद्रकांत घुगूल यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम झरी जामणी तालुक्यात सुद्धा अंजीर फळाचे उत्पादन होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.
दुष्काळी भागातील वातावरण अंजीरसाठी पोषक असते. अंजीर हे खूप पौष्टिक फळ आहे. ताज्या अंजीरमध्ये 10 ते 28 टक्के साखर असते. चुना, लोखंड आणि जीवनसत्त्वे ‘ए’ आणि ‘सी’ यांचा शरीरात चांगला पुरवठा केला जातो. अंजीर इतर फळांपेक्षा जास्त मौल्यवान मानले जातात कारण ते सौम्य रेचक, टॉनिक, पित्तविरोधी आणि रक्तशुद्धी रोधक असतात. तर दम्यासाठीही ते खूप उपयुक्त आहे.
कोणत्या हंगामात अंजीर घेता येते ?
अंजीर उष्ण आणि कोरडे हवामान चांगले सहन करतात. यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या भागात हे फळ पिकविण्याच्या दृष्टीने वाव आहे. कमी तापमान या पिकाला हानिकारक नाही. पण दमट हवामान नक्कीच धोकादायक आहे. विशेषत: कमी पर्जन्यमान असलेल्या भागात अंजीर पिकवता येतात, जेथे ऑक्टोबर ते मार्च या काळात पाण्याची उपलब्धता कमी असते.
अंजीर लागवडीसाठी जमीन कशी असावी?
माध्यम काळ्या आणि लाल मातीतील अत्यंत हलक्या प्रतीच्या जमिनीत फळबागांमधून अंजीर पिकवता येतात. मोठ्या प्रमाणात चुनखडीसह खारट काळ्या मातीत अंजीर उत्तम वाढते. अंजीरांसाठी चांगले ड्रेनेज असलेली मीटर खोल माती चांगली राहते. तथापि या मातीत चुन्याचे प्रमाण असले पाहिजे. या फळझाडासाठी खूप काळी माती अयोग्य आहे. झाड उथळ आणि चांगल्या ड्रेनेज मातीत पाहिजे तितके वाढत नाही अशी माहिती प्रगतीशील शेतकरी चंद्रकांत घुगुल यांनी दिली.
कोणत्या आहेत प्रगत जाती, अंजीरचे अनेक प्रकार असतात. पुणेरी दिनकर,सिमरन, कालिमिर्ना, कडोटा, अश्या अनेक जातीचे रोपे मिळतात. ताजे For fress fruits, contact Chandrakant Ghugul on mobile number, ताजे अंजिर साठी संपर्क 7350689968. सर्व प्रकारचे फळ, चंदन, मोहगणी, मिलियादुबिया, रोपांसाठी 9422673123 राजु तुरणकर यांच्याशी संपर्क साधावा.