मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी विक्की बांगर यांची नियुक्ती

वणी /

मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी विक्की बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी शुक्रवारी २१ मार्च ला एका नियुक्ती पत्राद्वारे केली.
 नियुक्तीपत्र देतेवेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य परशुराम पोटे, अमोल कुमरे, वेणुदास हुसुकले, विशांत मेश्राम, सोनु भाऊ पाटील उपस्थित होते.
 सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे विक्की बांगर यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post