वणी /
खैरी गावाजवळ असलेल्या शनि मंदीराजवळ स्वयंपाकाला जात असताना ऑटो पलटी झाला या झालेल्या अपघातात एक महिला ठार तर दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मार्डी पासून दोन किमी अंतरावर असलेल्या बामर्डा फाट्याजवळ घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी येथील दिलीप येसेकर यांचा शनी मंदिरजवळ स्वयंपाक असल्याने आज शनिवारी १५ मार्च रोजी सकाळी ऑटोने खैरी येथे जात असताना मार्डी जवळील बामर्डा फाट्याजवळ खड्डा चुकवण्याच्या नादात ऑटो पलटी झाला या झालेल्या अपघातात वनोजा देवी येथील शोभा पत्रू दारुणकर या (65) वर्षीय महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याने तातडीने तीला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्या महिलेला मृत घोषित केले. तर ऑटोतील माया तुकाराम कडुकर वय 55 वर्ष आणि जिजा रमेश येसेकर वय 40 वर्ष या दोन महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बातमी लीहेपर्यंत या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.