वणी/
येथिल अन्नपुरवठा विभागात सावळा गोंधळ उडाला आहे. नवीन शिधापत्रिका असो की नाव कमी करणे किंवा नाव चढवने याकरिता चक्क पाच ते सहा महिने लागत असल्याने गोरगरीब जनता हैराण झाले आहेत मात्र तहसील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने अखेर महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने पुढाकार घेतला असून याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांना देण्यात आले आहे.
सविस्तर बातमी अशी की, वणी ग्रामीण व शहर भागातील गोर गरीब, निराधार, वयवृध्द महिला, पूरूष सर्वसामान्य जनतेला नवीन सिधा पत्रिका काढणे, नाव कमी करणे, नाव चढविणे याकरिता वणी येथील तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात जावे लागतात मात्र त्या विभागात कागदपत्रे सादर करण्यासाठी एखच खिडकी असुन तेही दुपारी दोन वाजता खोलतात आणि चार वाजता बंद केल्या जातात त्यामुळे गावखेड्यातुन आलेल्या गोरगरीब जनतेला दुपारपर्यंत ताटकळत बसावे लागते इतकेच नाही तर कोणतीही माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, दोन दिवसांनी या, दुपारी दोन वाजता या असे म्हणतात, योग्य मार्गदर्शन केले जात नाही त्यामुळे गाव खेड्यातील जनतेला अन्न पुरवठा विभागात दररोज पायपीट करावी लागत असल्याने
नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच तहसीलच्या बाजूचे सेतू सुविधा केंद्र बंद असल्यामुळे अर्जदार पुरवठाविभागामध्ये अर्ज सादर करित आहे. परंतू अन्न पुरवठा विभागातील कर्मच्याऱ्यांच्या नियोजनामध्ये अभाव अल्यामुळे त्याचा फटका सर्वसामन्य गोरगरिब जनतेला बसत आहे.
त्यामुळे अन्न पुरवठा विभागात दोन खिडक्या सुरू करण्यात याव्या व त्याची वेळ ११ ते ५ करण्यात यावी व कार्यालय लाभार्थ्यांकरीता कार्यालयीन वेळेत खूले ठेवण्यात यावे तसेच तहसीलच्या बाजूचे सेतू केंद्र तात्काळ सूरू करण्यात यावे , जनहितार्थ मागणी पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र प्रदेश सरपंच जिल्हा व तालूका संघटने तर्फे बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर, तालुकाध्यक्ष प्रविण झाडे, राजेंद्र इद्दे, ऍड. रुपेश ठाकरे, अजय कवरासे, गणेश टेकाम, पुखराज खैरे, सतिश राजूरकर, बंडु खंडाळकर, सौ गीता उपरे, सौ विद्या पेरकावार, सौ कल्पना टोंगे, छबुताई शेरकी,सौ दुधबळे इत्यादी सह सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.