त्या अपघातातील जखमींच्या मदतीसाठी अजिंक्य शेंडे आले धावून..., कोल वाशरी प्रशासनाला धरले धारेवर , जखमींना मिळाली मदत

वणी /

 वणी वरून काम आटोपून आपल्या गावाकडे दुचाकीने परत जात असताना त्यांच्या दुचाकीला MH -40 CM -5159 या भरधाव हायव्हा ट्रकने धडक दिली या अपघातात ब्राह्मणी येथिल दोन इसमाला गंभीर इजा झाल्याची घटना शुक्रवारी 28 फेब्रुवारी ला सकाळी 10-30 वाजे दरम्यान घडली.

  दुचाकीस्वार महादेव उपरे(45) तर महादेव मंगाम (55) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. उपरे यांचा पाय तर मंगाम यांच्या हाताला गंभीर मार लागून फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. जखमींना सुरुवातीला वणी येथिल एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर करण्यात आले तिथे त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. 
दुचाकी स्वरांचे 'दैव बलवत्तर होते म्हणून त्यांचे जीव वाचले' असे अपघात स्थळी पाहणाऱ्यांचे म्हणणे आहे, कारण हायवा ट्रक वाहनाच्या मधोमध दुचाकी फसल्याने कोणी वाचेल असे कोणालाही वाटले नव्हते असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.
सदर घटनेची माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांना मिळताच त्यांनी अपघातग्रस्तांची भेट घेऊन माहिती घेतली त्यावेळी वाहन मालक रूग्णांना मदत देण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अजिंक्य शेंडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह सरळ संबंधित कोल वासरीच्या कार्यालयात जाऊन अपघातग्रस्तांना मदतीकरीता प्रशासनाला धारेवर धरले व त्यांना आर्थिक मदत करण्यास भाग पाडले. त्यामुळे अजिंक्य शेंडे यांचे कौतुक होत आहे.
यावेळी योगेश उपरे, यश खामणकर, रुपेश उपरे , सुजित काळे , रमेश डाखरे, अक्षय आवारी, प्रीतम राजगडे, नागेश काकडे, हनुमान आवारी, गणेश काळे,विवेक राजगडे, बीटा राजगडे, मनोज वाकटी, कुंदन पेंदोर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post