रविवारी सोरायसिस व त्वचाविकार रोगनिदान शिबिराचे आयोजन , मोफत रोगनिदान शिबिराचा लाभ घ्यावा - वैद्य.सुवर्णा चरपे

वणी/

श्री विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र वणी व्दारे मोफत "सोरायसिस व त्वचा विकार रोगनिदान शिबिर" दि.२ मार्च २०२५,रोज रविवारी सकाळी ७.३० ते रात्री ८.३० या वेळेत संपन्न होणार आहे. रोगनिदानाकरीता शक्यतो उपाशीपोटी नाडी यावे. सोरायसिस सारख्या दुर्धर व चिवट त्वचाविकारामुळे अख्खे कुटुंब उध्वस्त होते.सामाजिक जीवन अवघड होते. या व अश्या आजारांवर वणी शहरात पुण्याच्या प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व नाडी परिक्षण तज्ञ वैद्य.सुवर्णा चरपे ह्या रुग्ण तपासणी करणार आहेत.शिबिरातील पाच गरजवंतांना सप्ताहभराची मोफत औषधी वितरण होणार आहे.शिवाय पंचकर्म सुविधेवर विशेष सवलत प्राप्त होणार आहे.सोरायसिस व त्वचाविकार हे केवळ औषधोपचारांनी बरे होणारे आजार नाहीत. त्यांच्या समुळ उच्चाटनासाठी रक्तशुद्धी व मन:शांती ,योग्य आहार गरजेची आहे.तद्संबंधी मार्गदर्शन डॉक्टरांकडून योग्य सल्ला उपलब्ध होणार आहे. वणी कर व पंचक्रोशीतील नागरिकांनी आपले मोफत रोगनिदान आयुर्वेदोक्त नाडी परीक्षणामार्फत करुन घेण्याचे आवाहन वैद्य. सुवर्णा चरपे श्री विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र सर्योदय चौक वणी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post