वणी /
वणी परीसरात सध्या वाळु तस्करी जोमात सुरू आहे एकीकडे गोरगरीब जनतेला घरकुलासाठी वाळु मिळत नाही कारण रेती घाट बंद आहे तर दुसरीकडे मात्र रात्रभर वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
असे नाही की रेती घाट बंद असल्याने घरांचे बांधकाम बंद आहेत, बांधकाम सुरू आहेत परंतु ते पैसे वाल्यांचे! गरीबांच्या घरकुलांचे नाही. कारण अवैध वाळू चे भाव दुप्पट तिप्पट असते मोठे वाहनधारक तर अंशी हजार रुपये प्रमाणे वाळूची वाहतूक करत असल्याचे बोलले जात आहे म्हणून तर ते गरीब घरकुल धारकांना परवडणारे नाही. त्यामुळे गोरगरीबांना घरकुल बांधकामासाठी वाळू मिळणार तरी कशी आणि कधी! असा प्रश्न पडला असुन परिणामी घरकुलांचे बांधकाम रखडले आहे.
तर दुसरीकडे रेती माफिया रात्रभर वाळूची अवैध वाहतूक करुन मालामाल होत आहे.
घुग्गुस,शिंदोला, अहेरी बोरगाव, मेंढोली, कायर, नेरड पुरड यासह ग्रामीण भागातील नाल्याधोड्यातुनही वाळुची वाहतूक होत आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे लक्ष नाही असे नाही लक्ष आहेत परंतु काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे परिणामी इमानदार अधिकारी कारवाई करण्यासाठी धजावत नाही. जर कारवाईसाठी जिवावर उदार होऊन गेलेच तर रेती तस्कर त्या अधिकाऱ्यांना जुमानत नाही याचं उदाहरण काही दिवसांपूर्वीच घडलं आहे. तालुक्यातील एका गावात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच महसूल विभागातील एक अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्या गावात एक वाहन वाळू खाली करतांना दिसताच त्या वाहनावर कारवाई करण्यासाठी ते अधिकारी पोहोचले मात्र त्या वाळु तस्कराने सदर अधिकाऱ्यांना धक्का देऊन आपले वाहन घेऊन पसार झाला या घटनेची एका न्यूज पोर्टल वर बातमी झळकली मात्र सदर घटनेची तक्रार देण्यासाठी प्रशासनाला तब्बल पाच दिवस लागले हे विशेष...
रेती घाट बंद असल्याने तस्करी सुरू आहे परिणामी शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे तर रेती तस्करांसह प्रशासनातील काही मालामाल होत आहे. "तेरी भी चूप मेरी भी चूप" असा खेळ सुरू आहे.
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते मात्र थातुरमातुर लहान वाहनांवर कारवाई मोठ्यांना मुभा अशी ओरड आहे. याकडे शासनाने गंभीरपणे दखल घेऊन रेती घाट तात्काळ सुरू करावे अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.