वणी /
वणी विधानसभा जयस्वाल समाजाच्या अध्यक्षपदी राजेंद्र जयस्वाल तर उपाध्यक्षपदी अतुल जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे.
स्थानिक शिवाजी महाराज उद्यानात दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी झालेल्या जयस्वाल समाजाच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी वणी विधानसभा संघातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
*दिनेश जयस्वाल यांना श्रद्धांजली!*
जयस्वाल समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते दिनेश जयस्वाल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले त्यानिमित्त पदग्रहण सोहळा समारंभ कार्यक्रमात जयस्वाल समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
*समाजाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार*