मानकी ग्राम पंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

वणी /

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजा मानकी येथिल ग्राम पंचायत कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
१९ फेब्रुवारी ला सकाळी ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच कैलास पिपराडे यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला.
यावेळी उपसरपंच शंकर माहुरे, परशुराम पोटे, अंगनवाडी सेविका सौ बेबीताई मालेकर, सुनीता पत्रकार, प्रदिप मालेकर, अविनाश सरवर, अमर खुसपुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post