वणी :
वणी विधानसभेचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वतीने सामाजिक समता, न्याय, बंधुता आणि ऐक्याचा महामंत्र देणारे महान समाजसुधारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक वणी येथे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
समाजातील अस्पृश्यांना दिली जाणारी हीन वागणूक बाबासाहेबांनी जवळून पाहिली. या अन्यायकारक वागणुकीविरोधात लढा देत वंचित घटकांच्या न्याय आणि हक्कांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले.
याप्रसंगी भाजपाचे माजी जिल्हा महामंत्री रवि बेलूरकर उपस्थित होते.