आज भव्य विदर्भस्तरिय 'फॅशन रणवे' काऊचर कार्निवलचे आयोजन, ''रॅम्प वॉक' मधून मूकबधीर विद्यार्थी दाखविणार कौशल्य

वणी : 
केएफडी वणी आणि टीम मशुरी नागपूरद्वारे आज ८ डिसेंबर रोजी येथील महालक्ष्मी रिसॉर्ट येथे विदर्भस्तरीय फॅशन रनवे आणि काऊचर कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. या 'फॅशन शो' मध्ये मुकबधीर मुलांसह मुलीही रॅम्प वॉक करणार असल्याची माहिती, विश्रामगृहावर आयोजित एका पत्रपरिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना

शहरात प्रथमच 'फॅशन शो' चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुकबधीर मुले व मुली आपले कौशल्य सादर करंणार आहेत. मूकबधिरांच्या आयुष्यात आशेची एक नवी किरण निर्माण करंणे हा यामागचा उद्देश आहे. या प्रकारचे फॅशन शो जास्तीत जास्त मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर यासारख्या मेट्रो शहरात होत असतात. परंतु, सांस्कृतिक वैभव लाभलेल्या वणी शहरात अशा प्रकारच्या भव्य स्वरूपाचा फॅशन शो आयोजित होत आहे. मुख्य उद्देश विभागातील लहान मुले, महिला व युवा वर्ग यांना एका नव्या मंचावर आपली कला व गुण सादर करून कला क्षेत्रात आत्मविश्वास वाढवता आला पाहिजे व महिला सक्षम बनविण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ५२ स्पर्धकांची नोंदणी झाली असून, यामध्ये नागपूर, अमरावती, वणी आणि ओडिशासारख्या राज्यातून स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. या फॅशन रनवे शो ला वणी सारख्या शहरात घेण्याकरिता अनेक महिन्यांचा अभ्यास करावा असल्याची माहिती पत्रकार परिषदेत केएफडीचे संचालक कशीष विजय पुण्यानी, देवश्री विकास बंडेवार नागपूर, सनी सिंघ नागपूर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post