शिक्षकांना अद्यावत करून त्यांच्या शंका समाधानासाठी शिक्षण परिषद आवश्यक - गिरीधर चवरे

वणी: 
           प्रत्येक शिक्षकाला अध्ययन अध्यापन करताना अनेक अडचणी येतात. शासनाकडून सुरू करण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व योजनाची माहिती प्रत्येक शिक्षकाला व्हावी यासाठी केंद्र स्तरावर शिक्षण परिषद आवश्यक असते. असे प्रतिपादन वणी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे यांनी केले. ते नगर परिषद शाळा क्रमांक 6 मध्ये आयोजित शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 
         या शिक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुवर्णा चरपे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वंदना मंचावर, गजानन कासावार, दिलीप कोरपेनवार, चंदू परेकर, रविकिरण आत्राम, मंगला पेंदोर उपस्थित होते. 
      या प्रसंगी प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे यांच्या शिक्षण विभागातील समर्पक कार्याबद्दल शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांच्या व शाळा क्रमांक 6 च्या शिक्षिका कविता इंगोले यांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटन सत्रामध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता व शिक्षकांची भूमिका या विषयावर वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. 
       उद्घाटनानंतर शिक्षण परिषदेच्या उद्देशाबद्दल केंद्र समन्वयक चंदू परेकर यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांचा स्तर निश्चित करण्यासाठी घेण्यात येत असलेल्या परख या राष्ट्रीय सर्वेक्षणाबद्दल माहिती गजानन कासावार यांनी दिली. मंगला पेंदोर यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी केली पाहिजे, त्यासंदर्भातील शासकीय आदेशांची माहिती दिली. अपार आय डी कशी तयार करायची याबाबत साधन व्यक्ती सतीश कुरेकर यांनी दिली. असाक्षरांना साक्षर करण्यासाठी निलीप अँप संदर्भात अशोक कोंगरे यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. त्यानंतर दिलीप कोरपेनवार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. 
बोलतांना प्रशासन अधिकारी रीधर चवरे 

      या शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक शाळा क्रमांक 6 चे मुख्याध्यापक रविकिरण आत्राम यांनी केले. सूत्रसंचालन कविता इंगोले यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post