आज संजय खाडे यांचा वणीत रोड शो व जाहीर सभेचे आयोजन , जत्रा मैदान येथून होणार रॅलीला सुरुवात

वणी - 
विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज सोमवारी दिनांक 18 नोव्हेंबर ला अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा रोड शो व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिपक चौपाटी जत्रा मैदान येथुन रोड शोला (पदयात्रा) सुरुवात होणार आहे. काठेड ऑईल मील चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, दीपक चौपाटी व जत्रा मैदान असा रोड शोचा मार्ग आहे. पदयात्रेनंतर जत्रा मैदान येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मतदारांनी रोड शो व जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संजय खाडे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post