वणी :
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज सोमवारी दि.18 नोव्हेंबर ला महायुतीचे उमेदवार आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारार्थ शहरात भव्य रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला तेलंगणा राज्यातील भाजप नेत्या माधवी लता संबोधित करणार आहे. तत्पूर्वी शहरात त्यांचा रोड शो होणार आहे येथील शासकीय मैदान पाण्याची टाकी जवळुन सकाळी 11 वाजता रॅली निघणार आहे.
मतदार संघातील वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील हजारो भाजप कार्यकर्ता या सभेसाठी शहरात दाखल होणार आहे.
माधवी लता यांनी हैद्राबाद मधून एआयएमआयएम चीफ असदुद्दीन ओवैसी विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली होती. भाषणाच्या शैलीमुळे लता माधवी यांची देशभरात वेगळी ओळख निर्माण झाली. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सलग दोन वेळा निवडणूक जिंकली असून आता हॅट्रिकच्या तयारीत आहे. विकास पुरुष तथा जनतेला सहज उपलब्ध होणारे आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. शिवाय मागील 10 वर्षात त्यांनी कोट्यवधीची निधी विकासकामांसाठी खेचून आणली आहे. महायुतीच्या प्रचार रॅली व जाहीर सभेत मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन भाजपा, महायुती कडून करण्यात आले आहे.