सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वणीत, मविआ चे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

वणी : 

वणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवार, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय मैदानावर भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या ओजस्वी वक्तृत्वशैलीसाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे सभेत ते उपस्थितांशी थेट संवाद साधतील अशी अपेक्षा आहे. शिवाय, राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ते आपली भूमिका स्पष्ट करतील, तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या विविध योजना व संकल्पनांना पाठिंबा देतील.

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर, काँग्रेस पक्षाचे नेते राजू कासावार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख नेते सुनील कातकडे यांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
सभेला वणी शहरासह परिसरातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post