वणी विधानसभा क्षेत्रात आ. संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचाराचा झंझावात

वणी : दिपक छाजेड 

आगामी विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रचारार्थ गावोगावी दौऱ्याला सुरुवात केली आहे. 
रविवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील वांजरी, मजरा, नांदेपेरा, भुरकी, वडगाव, झोला, कोना, सावर्ला, नायगांव, निळापूर, ब्राह्मणी, भालर, तरोडा, निवली इत्यादी गावभेट दरम्यान गावातील नागरिकांशी संवाद साधत आशीर्वाद मागितला. यावेळी गावकऱ्यांनी या प्रचार दौऱ्याला भरभरून प्रतिसाद दिला यावेळी ग्रामवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविला.
 यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बंडु चांदेकर, ख.वि.संघाचे अध्यक्ष अशोक सुर, शिवसेना जिल्हाप्रमुख विनोद मोहितकर, भाजपा तालुका सरचिटणीस मंजू डंबारे, दीपक मत्ते, सचिन खाडे, महेश देठे, भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post