वणी -
वणी शहर माळी समाज संघटनेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची 134 वी पुण्यतिथी निमित्त दिनांक 28 नोव्हेंबर 2024 ला गुरुवारी सकाळी 11 वाजता महात्मा ज्योतिबा फुले चौक सम्राट अशोक नगर येथे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माळी समाज संघटनेचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक नागरिक यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशातील स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते स्त्री शिक्षणासाठी त्यांनी अहोरात्र झटून लढा चालविला स्त्री शिक्षणाचे महत्त्व शक्ती लोकांना पटवून दीली. त्यांनी अनेक संघर्ष करत चळवळ पुढे नेली. अशा थोर समाजसेवकाला त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने माळी समाज संघटनेचे प्रवीण निकोडे, भास्कर मोहुर्ले, अक्षय निकोडे, बंडू वाढई, भास्कर वाढई, बापूजी वाढई, चंदन मोहुर्ले, नितीन मांदाडे, हर्षल शेंडे, अमित चटारे, संजय भेंडाळे, गोपाल भेंडाळे, सिद्धू गुरनुले, देव वाढई, रवी मांदाडे, अनुप काटकर, रमेश काटकर, महेश टिपले, अजय सोनुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या अभिवादन कार्यक्रमाला परिसरातील नागरिक तथा माळी समाज संघटनेचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.