वैद्य.चरपें यांच्याकडे धन्वंतरी पूजन व उत्पादन प्रक्षेपण सोहळा...

वणी :
 शहरातील सर्योदय चौक येथील श्री विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र येथे आज मंगळवारी विद्यावाचस्पती श्री.स्वानंद पुंड व जेष्ठ पत्रकार श्री.गजानन कासावार यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले.
दरवर्षी धनत्रयोदशीला‌ आरोग्याचे दैवत धन्वंतरी प्रगट दिन साजरा केला जातो. सुदृढ जिवनशैली व संपन्न आयुष्य जगण्याची दिशा देणाऱ्या आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून आयुष मंत्रालयातर्फे यावर्षीपासून 101 देशांमधे आंतरराष्ट्रीय स्तरावर धनत्रयोदशीला "राष्ट्रीय आयुर्वेद दिवस" घोषित करुन साजरा केला आहे. निसर्गाच्या चक्राशी‌ जुळवून घेणे म्हणजे आरोग्य संपन्न राहणे अशी मुलभूत संकल्पना असलेला आयुर्वेद शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्तरावर मानवी आरोग्य जपतो.
वणी शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य.सुवर्णा चरपे यांच्याकडे धन्वंतरी पूजन नंतर लगेच त्यांनी स्वतः तयार केलेले कौस्तुभकांती उटणे, कौस्तुभकांती अभ्यंग तैल, कौस्तुभकांती केश्य तैल या तिन उत्पादनांचे श्री.स्वानंंद पुंड यांनी औषधीकलश अभिमंत्रोच्चारीत करुन‌ शंखध्वनीमधे दिमाखदार प्रक्षेपण सोहळा संपन्न केला.
. वैद्यकीय व्यवसाय चतुष्पादांवर अवलंबून असतो. कुशल वैद्य, गुणकारी औषधे,चतुर, प्रसंगावधानी परिचारक व आज्ञाधारक रुग्ण हे ते चार पाय आहेत. चतुष्पादातील एक पाद म्हणजे परिचारक. ‌
या प्रसंगी उपचार केंद्रातील सेवाभावी‌ परिचारीका सौ. सुनंदा शिलमनवार यांचा सन्मान‌ सौ.भावनाताई गंगमवार तर‌ पंचकर्म थेरपिस्ट निखिल वाघाडे यांचा सन्मान स्वानंद पुंड यांच्या हस्ते पार पडला. वैद्य.चरपे यांनी प्रक्षेपित औषधींचे गुण ,कर्म विषद‌ केले. तसेच सहा‌ महीन्यात उपचार केंद्राद्वारे राबवलेल्या पंचकर्म चिकित्सा,शरद‌ऋतूतील विरेचन उपचार ‌नवरात्रोत्सवातील स्त्रीयांचे आरोग्य तपासणी शिबिर,, कोजागिरीचे दम्याचे शिबिर, सुवर्ण प्राशन इत्यादी उपक्रमांची माहीती दिली. श्री.कासावार, कुळकर्णी‌, सौ.गंगमवार, सौ.कुळकर्णी यांनी कार्यक्रमास शब्दसुमनांनी सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाकरीता सौ.निलिमाताई काळे,सौ.हर्षदा शेंडे,सौ. गिता पांपट्टीवार,कु.रजनी गारघाटे,कु वेदिका शेंडे , ताराताई कुळकर्णी श्री.सोनटक्के, परशुराम पोटे, डॉ.अभिजित अणे ,अमोल कुळकर्णी, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post