वणी :
मोकाट भटकणार्या व नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणार्या कुत्र्यामुळे वणी शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील रंगनाथ नगर भागात एका चार वर्षीय मुलीला चावा घेतल असल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी त्या मुलीवर हल्ला चढवला यात ती बालीका गंभीर जखमी झाली असून तिच्या हातावर चार ते पाच जागी चावा घेतल्याने त्या मुलीला प्रथम उपचारासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्रथम उपचारानंतर तीला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे अशी माहिती मिळाली.
विशेष म्हणजे अनेक कुत्र्यांच्या अंगावर घाव असल्याने ते जखमी झालेले आहेत त्यामुळे कधी उघड्या घरात शिरत आहे तर कधी नागरिकांवर हल्ला चढवला जातो आहे यामुळे आता नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नगरपरिषद हद्दीमध्ये नगर परिषद प्रशासनाने पाहिजे तसे लक्ष न दिल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगर परिषद हद्दीतील राम पुरा, दिपक चौपाटी, राम शेवाळकर परिसर येथे काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी काही मुलांच्या पायांवर हातावर चावा घेऊन जखमी केले होते. जखमी मुलांना त्वरित रुग्णालयात दाखल केले होते. नगर परिषदेने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगर परिषदेने निर्बिजीकरण व भटक्या कुत्र्याच्या तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.