वणी :
तब्बल वीस वर्षांपासून जैन ले आऊट ची अवस्था "धोबिका कुत्ता न घर का ना घाटका" अशी होती. ना ग्रामपंचायत ना नगरपरिषद मध्ये अशी अवस्था झाल्यानंतर या परिसरात चालण्यास धड रस्ते नव्हते. दिव्याच टीम टीम आल की जैन ले आऊट समजायचं कारण स्ट्रीट लाइट नव्हते. नाल्या तुडुंब भरलेल्या असायच्या त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून अनेक आजाराचा प्रादुर्भाव होत असे. या भयंकर समस्येने येथिल जनता त्रस्त झाली होती आणि नरक यातना भोगत होती. अशा स्थितीत आमदार बोदकुरवार यांनी प्रथम हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावला. गल्लोगल्ली रस्ते बनविले. स्ट्रीट लाइट ची व्यवस्था केली. एवढेच नव्हे तर जैन ले आऊट मधील हनुमान मंदिरासमोरील न.प.च्या जागेवर खुल्या ओपन शेडचे बांधकामाकरिता 4584083/- रुपये चा निधी मंजूर करून दिला. त्याबद्दल वणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय विकासपुरुष आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांचा येथिल ग्रामस्थातर्फे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित त्यांचा सत्कार करण्यात आला.
येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळ, देवस्थान समितीच्या वतीने सामुदायिक प्रार्थना, हनुमान चालीसा सह विविध प्रकारचे उपक्रम राबवून ग्रामस्थांमध्ये स्वच्छ्ता व सेवाभाव, ऐक्य, सुसंस्कार व सहकार्याची भावना रुजउन विकास घडऊन आणला जातो ही आनंदाची बाब आहे. त्यामुळेच जैन ले आऊट ला सुंदर बनविण्यासाठी मोठा निधी मंजूर करून दिला व पुढेही विकासनिधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन यावेळी आमदारांनी दिले.
राष्ट्रवंदनेनी या कार्यक्रमांची सांगता झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष्यस्थानी अरुण चटप होते. सत्कारमूर्ती म्हणून आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार तर अतिथी म्हणून विजय पिदुरकर, संजय ठाकरे, मारोती मालेकर, वामनराव मत्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामगिताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबाराव पिदुरकर, सुनिल माथनकर, पुंडलिक झाडे, देवराव जांभूळकर, मधुकर झाडे, प्रज्वल नागपुरे, धीरज ढाले, श्रिजित भोयर व सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.