वणी :
शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य सुवर्णा चरपे यांनी श्री विश्वयोग आयुर्वेदिक व पंचकर्म उपचार केंद्रातर्फे कोजागिरी पौर्णिमेला दम्याच्या औषधी वाटप शिबीर आयोजीत केले होते. सकाळी अनुशेपोटी नाडी परिक्षण व आयुर्वेदोक्त रोगनिदान, वजन , बिपी, एसपीओटू,पल्स,गजरवंतांना ब्लड शुगर इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या. आतापर्यंत दम्याच्या औषधी करीता वणी शहरातील रुग्ण कोजागिरीला भद्रावती,वा परिसरातील इतर शहरात जाऊन औषध घ्यावे लागायचे. यावर्षीपासुन या शिबीराव्दारे वैद्य.चरपे मॅडम यांनी वणीकरांना गावातच ही सुविधा तेही शास्त्रोक्त नाडी परिक्षण यासह उपलब्ध करून दिली. देण्याकरीता निम्मे उपचार पथ्यपाणी असते. कोजागिरीच्या दिवशी सकाळी ७.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत प्रत्येक रुग्णाची प्रकृती परिक्षणाअंती त्यांस पथ्यपाणी निट समजावुन सांगण्यात आले. तसेच जुनाट सर्दी, कोरडा खोकला , वारंवार न्युमोनिया होवून अशक्त फुफ्फूसाकरीता पंचकर्मातील विरेचन, वमन, नस्य,बस्ती उपचार सुचवण्यात आले आहे. याची अद्यावत सुसज्ज व्यवस्था व यंत्रणा श्री विश्व योग आयुर्वेदोपचार केंद्रात उपलब्धही करुन देण्यात आली आहे. ही वणीकरांकरीता आनंदाची बाब आहे.
शिबीरात एकूण साठ रुग्णांनी औषधोपचार व तपासणीचा लाभ घेतला आहे. परिसरातील एकंदरीत धुळीचे वातावरण बघता वैद्य.चरपे यांनी या शिबीराचे आयोजन केले होते मात्र तपासणी अंती बरेच रुग्णांना कोरोनापशचातचा दमा,आधी मुळव्याध त्यानंतर दमा,आधी सोरायसिस सारखा त्वचाविकार व नंतर दमा,बाल दमा, अनुवंशिक दमा ,असे विविध प्रकारचे दम्याचे लक्षण असलेले परंतू मुळ आजार वेगळाच.व मुळ आजाराच्या उपद्रव स्वरुपात दमा आढळुन आला. नाडी परिक्षणातुन निदान व उपचाराचे वैविध्य हे या शिबीराचे वैशिष्ट्य ठरले. या शिबिरात ३ वर्षांपासून तर वय वर्फे ८४ पर्यंतचे रुग्णांनी हजेरी लावली. प्रभावाने कार्य होणाऱ्या या शरदॠतूमधे त्रिपुरारी पौर्णिमा व दत्त पौर्णिमेला असेच पुन्हा दम्याचे औषधी वाटप होणार आहे.तरी रुग्णांनी पुर्व नोंदणीस या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विश्वयोग आयुर्वेदिक व पंचकर्म उपचार केंद्रातर्फे करण्यात येत आहे.