वणी :
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही श्री संत विदेही शंकरबाबा यांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्य संत विदेही शंकरबाबा देवस्थान, चिखलगांव येथे रविवार दि.२० ऑक्टोबर ते शुक्रवार दि.२५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रविवार दिनांक २० ऑक्टोंबर ला सकाळी ७.०० वा. घटस्थापना व अभिषेक, दुपारी १ वाजता भजन, सायं ७:३० वाजता ह.भ.प. आशिष महाराज माणुसमारे रा.पाचगाव यांचे किर्तन, सोमवार दि.२१ ऑक्टोबर ला दुपारी १ वाजता भजन व सायंकाळी ७:३० वाजता भारुडाचा कार्यक्रम, मंगळवार दि.२२ ऑक्टोबर ला दुपारी १ वाजता भजन व सायं. ७.३० वा. भारुडाचा कार्यक्रम, बुधवार दि. २३ ऑक्टोबर ला दुपारी १ वाजता भजन व सायं. ७.३० वा. किर्तन , गुरुवार दि. २४ ऑक्टोबर ला सकाळी ७.३० वा. ग्रामसफाई व रामधुन, सकाळी ९ ते ११ वा. रांगोळी स्पर्धा, दुपारी १२.३० वा. भजन, मंजुळा माता महिला भ.मं. चिखलगांव, शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर ला सकाळी १० ते दुपारी दुपारी १ वा ह.भ.प.डॉ. दामोधरपंत आवारी यांचे अमृतमय वाणीतून काल्याचे किर्तन व दहिहांडी बक्षिस वितरण व मान्यवरांचा सत्कार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम. इत्यादी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संत विदेही शंकरबाबा देवस्थान समिती व समस्त ग्रामवासी चिखलगांव, यांनी केले आहे.