विजय चोरडिया यांच्या हस्ते एकसे पन्नास विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. 8 वणी येथे दि 9 ऑक्टोबर ला शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते व भाजप चे प्रदेश सदस्य विजय चोरडिया यांच्या हस्ते एकशे पन्नास विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यवस्थापक समिती चे अध्यक्ष सचिन गुरनुले, प्रमुख अतिथी नगर परिषद शाळा क्र. 7 चे उच्चश्रेणी मुख्याद्यापक गजानन कासावर, मनिषा शिवरकर शाळा व्यवस्थापक समिती, दिलीप कोरपेनवार उच्चश्रेणी मुख्याद्यापक शाळा क्र. 8 व शिक्षक वृंद, विधार्थी उपस्थित होते .