वणी :
महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साधेपणाने साजरा करून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन वणी शहराध्यक्ष एड. निलेश माया महादेव चौधरी यांनी केले आहे. त्यांच्या या उपक्रमाला विविध स्तरांतून प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहराध्यक्ष प्रा. महादेवराव खाडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा केली.
संकटग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देणे, सामाजिक संवेदनशीलता जपणे आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेऊन मदतीसाठी योगदान देणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रा. महादेवराव खाडे यांच्या या योगदानामुळे एड. निलेश चौधरी यांच्या सामाजिक उपक्रमाला सहकार्य मिळाले असून, त्यांच्या मदतीचे कौतुक होत आहे.