नगर वाचनालयात नव्याने खरेदी केलेल्या स्पर्धा परीक्षा ग्रंथांचे प्रदर्शन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक प्रदर्शन, UPSC, MPSCसह विविध स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा वणीतील विद्यार्थ्यांना लाभ

वणी : 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त तसेच नगर वाचनालयाचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगर वाचनालय, वणीच्या वतीने नव्याने खरेदी करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
नगर वाचनालयामार्फत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. UPSC, MPSC, IBPS, SSC, बँकिंग, रेल्वे, राज्य लोकसेवा आयोग तसेच TET आदी परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त असलेल्या ग्रंथांचा या प्रदर्शनात समावेश आहे.
२५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता नगर वाचनालय सभागृहात या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींनी या प्रदर्शनास भेट देऊन उपलब्ध पुस्तकांची माहिती घ्यावी, असे आवाहन नगर वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक संदर्भ साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post