वणी परिसरात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा, दुपारी अडीच वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी पाचपर्यंत बरसला; रस्त्यांवर साचले पाणी

वणी :

वणी शहरासह परिसरात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तब्बल सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होता. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची काही काळ धावपळ झाली.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जोरदार पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचले असून, काही भागांत वाहतुकीवरही परिणाम झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

Post a Comment

Previous Post Next Post