वणीकरांसाठी दिलासादायक आरोग्यविषयक उपक्रम , सर्जिटेक हॉस्पिटलतर्फे १२ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबरपर्यंत निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर

वणी :

वणी शहरातील नागरिकांसाठी सर्जिटेक हॉस्पिटलच्या वतीने निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १२ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, विविध आजारांबाबत तपासणी तसेच तज्ज्ञांकडून वैद्यकीय मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, अस्थिरोग, किडनीविकार, कर्करोग, त्वचारोग, मानसिक आरोग्य, पोटाचे आजार तसेच फुफ्फुसांच्या आजारांबाबत वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या उपचारांबाबत रुग्णांना समाधान मिळत नसल्यास त्यांच्यासाठी ‘सेकंड ओपिनियन’ची निःशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारांबाबत दुसरे वैद्यकीय मत घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांनाही या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.
सर्जिटेक हॉस्पिटलमध्ये २४ तास आपत्कालीन सेवा, ICU व Critical Care, रुग्णवाहिका, औषधालय, खासगी कक्ष, जनरल वॉर्ड, ECG तसेच 2D Echo यांसह विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.
निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिरासाठी सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत संपर्क साधता येणार असून, अधिक माहितीसाठी ०७२३९-२९९१०३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता : काळे लेआउट, ब्राम्हणी रोड, विवेकानंद शाळेजवळ, वणी.
आपल्या तसेच कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी या निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सर्जिटेक हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post